झोपडी ते पक्के घर...
झोपडी ते पक्के घर! ....... माझे लग्न जमले तेव्हा मी दुसऱ्यांच्या घरी राहून एस वाय बी ए चे शिक्षण घेत होतो. "मला राहायला घर नाही. हाताला काम नाही. खायला अन्न नाही!" असे मी नव्या पाहुण्यांना सांगून ही त्यांनी मा झे लग्न लावून दिले. औंधमध्ये मोक्याच्या ठिकाणी माझी वडिलार्जित जागा होती. त्यातील थोडी जागा शेजारच्या वयक्तीला भाड्याने दिली होती. त्या जागेवर त्याने आठ बाय दहा चा दुकान गाळा बांधला होता. तो काही कारणास्तव न चालल्याने तो गाळा तसाच पडून होता. म्हणून आईने त्याला विनंती करून तो गाळा काही काळासाठी राहण्यासाठी म्हणून घेतला होता. त्यानंतर तो गाळाच आमचा निवारा ठरला होता.......! अश्या स्थितीतच माझे लग्न झाले. आणि लग्न होऊन मी बायकोला घेऊन आईसोबत राहू लागलो. डोक्यावर छत असले तरी ते खूपच अपुरे होते. याची जाणीव आम्हाला लवकरच झाली. लग्नाचे सर्व सोपस्कार पार पडले. घरातील जेवढे म्हणून अन्नधान्य होते ते दोन तीन दिवसांतच संपले. हाताला काम नव्हते त्यात 'आणा'...